माळशिरस येथील दुर्घटनेनंतर रस्त्यालगत असलेल्या विहिरी आणि धोकादायक ठिकाणांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी अद्यापही धोकादायक परिस्थिती कायम असल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर-भीमाशंकर मार्गावरील शिनोली ते कानसे रस्त्यावरील एका पुलाची अवस्था याचेच उदाहरण ठरत आहे.