मुंबईतला पांढऱ्या पट्ट्यांचा वाद पुन्हा तापणार अशी चिन्ह आहेत. कारण घाटकोपरमध्ये सोसायटीत पांढरे पट्टे काढण्यास विरोध केलेल्या प्रसाद वेदपाठकवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. घाटकोपरच्या कैलाश अॅव्हेन्यू सोसायटीमध्ये पांढरे पट्टे मारण्यात आले होते. त्याला प्रसाद वेदपाठक यांनी विरोध केला होता. आता याच प्रसाद वेदपाठकवर घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रसाद वेदपाठक ज्या कैलाश अॅव्हेन्यूमध्ये राहतो त्या सोसायटीच्या चेअरमनची मुलगी कृपा याज्ञिक हिने यासंदर्भात तक्रार दाखल केलाय. प्रसाद वेदपाठकने आपल्याला शिवीगाळ केली तसंच घरापर्यंत येऊन दमदाटीचा प्रयत्न केला असा आरोप तीने केलाय..