सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा ही सर्वत्र सुरू आहे दुसरीकडे ओमराजे निंबाळकर हे काय भूमिका घेत आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे यातच जे बाकीचे पाच खासदार आहे ते सध्या उज्जैन मध्ये असल्याचा एक फोटोचा पुरावा एनडीटीव्ही च्या हाती लागलेला आहे या पाच खासदारांची ही टूर सुरू आहे या दरम्यान दुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांच्याशी देखील सातत्याने संपर्क सुरू आहे या पाच खासदारांची धाकधुक वाढली आहे हे तितकेच खरे आहे या दरम्यान आता पुन्हा एकदा या ऑपरेशन टायगर ची चर्चा ही चांगलीच रंगू लागली आहे.