आरटीओ वसुली रॅकेटचा ndtv मराठीने पर्दाफाश केल्यावर आता याचे राजकीय पडसाद देखील उमटताना दिसत आहे. या सर्व रॅकेटप्रकरणी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या रॅकेटमध्ये गुड्डू सेठ नावाचा व्यक्ती अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी खोट्या एसीबीच्या कारवाया घडवून आणत असल्याचा आरोप केला. एनडीटीव्ही मराठीच्या हाती देखील याबाबतचे काही पुरावे लागले आहेत. मागील काही दिवसात या गुड्डू शेठने तीन खोटे एसीबीच्या कारवाया घडून आणण्याचा आरोप आहे. जेव्हा या कारवायामध्ये वापरण्यात आलेल्या गाड्यांची व्हेकल हिस्ट्री परिवहन विभागाने तपासली, तेव्हा या गाड्या मध्यप्रदेशच्या असल्याचे समोर आले.