जगातील सर्वात उंच ब्रिज म्हणजे चिनाब ब्रिज.नदीपात्रापासून ३५९ मीटर म्हणजेच अगदी फ्रान्सच्या आयफेल टॉवरपेक्षाही उंच असलेल्या या ब्रिजवरून धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा एक सुंदर व्हिडिओ रेल्वे मंत्रालयानं जारी केलाय. मान्सूनचे काळे ढग दाटलेले,, उंचीवरील ब्रिज पार धुक्यात हरवलेला आणि अशात हे ढग आणि धुकं चिरत दिमाखात धावणारी वंदे भारत ट्रेन डोळ्यांचं पारणं फेडणारी ठरतेय.