बातमी NDTVच्या इम्पॅक्टची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र प्रकरणी मोठी कारवाई केली आहे.वित्त व लेखा विभागातील कर्मचारी रमेश दामोदर मुखेकर यांच्यावर ७० हजार रुपये घेऊन बनावट कागदपत्रे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.संबंधित व्यक्तीने व्हॉट्सअॅपद्वारे मूळ कागदपत्रांसारख्या दिसणाऱ्या प्रतिमा पाठवल्याची तक्रारही करण्यात आली होती.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने मुखेकर यांना तात्काळ निलंबित केले असून चतुःशृंगी पोलिस ठाण्यात अधिकृत फिर्यादही दाखल केली आहे.