भाजप नेत्या डॉ. हिना गावीत यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह भाषेप्रकरणी भाजप नेते विजय चौधरी यांच्याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. डॉ. हिना गावीत यांचे चुलत भाऊ रोहन गावीत यांच्या फिर्यादीवरून जातीवाचक शिवीगाळ आणि विविध कलमांखाली शहर पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला. दरम्यान व्हायरल होत असलेल्या सर्व ऑडिओ क्लिप्स या एआय तंत्रज्ञानाचा वापर करून छेडछाड करून तयार केल्याचा दावा विजय चौधरींनी केलाय..