पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा आज पुण्यात होत आहे. सर्वच पवार कुटुंब या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलंय.. शरद पवार, सुप्रिया सुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झालेत. सुप्रिया सुळेंची लेक रेवती सुळेदेखील आपल्या पतीसह साखरपुड्यासाठी पोहोचली.या साखरपुडा सोहळ्यासाठी खास पण मोजक्या पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व 40 आमदार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह विविध पक्षातील 15 खासदारही या सोहळ्याला उपस्थित राहतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर पक्षातील प्रमुख नेत्यांना साखरपुड्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.पार्थ पवार यांचा विवाहसोहळा २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे संपन्न होणार आहे. त्यापूर्वी आज साध्या आणि कौटुंबिक वातावरणात, मोजक्या नातेवाईकांच्या आणि काही निमंत्रित व्यक्तींच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ पार पडणार आहे..