राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी आहे. मराठी न बोलणाऱ्या चालकांवर 17 ऑगस्टनंतर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. हिंदीभाषिक आणि इतर अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली असून राज्यभर सुमारे 450 शिक्षकांच्या माध्यमातून मराठी प्रशिक्षण दिले जात आहे. 17 ऑगस्ट रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे या मोहिमेची सांगता होणार आहे. त्यानंतर प्रवाशांशी आवश्यक तेवढा मराठीत संवाद साधता न आल्यास संबंधित चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिलीय