Sangli Ganeshotav | हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक, गणपती मिरवणूक येताच घुमतात कव्वालीचे सूर
A symbol of Hindu-Muslim unity: the strains of Qawwali resonate as the Ganpati procession arrives.
दर्गाह-मशिदीसमोरून गणेश मिरवणूक जाताना तणावाचे प्रसंग घडल्याच्या बातम्या अनेकदा समोर येतात... मात्र,सांगलीच्या मिरजेत याचं एक वेगळं आणि सुखद चित्र पाहायला मिळतंय. इथं गणरायाची मिरवणूक ख्वाजा मिरासाहेब दर्ग्याच्या समोर येते,आणि वातावरणात घुमतो तो कव्वालीचा सूर. "भर दे झोली ,मेरी या मोहम्मद, ख्वाजा मेरे ख्वाजा,अश्या अनेक मुस्लिम धर्माशी निगडित गाण्या’च्या सुरांवर गणेशभक्त ठेका धरतात.हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळख असलेल्या ख्वाजा मिरासाहेब दर्ग्याच्या समोरून मिरजेतील अनेक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका जातात.