अकोल्याच्या दुष्काळी आढावा बैठकीत झोपा काढणाऱ्या महिला अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलंय. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुष्काळसदृश स्थितीचा आढावा घेण्यासाठी दुष्काळी आढावा बैठक घेतली होती.. अकोलामधल्या बैठकीत झोपी गेलेल्या वरिष्ठ भू वैज्ञानिक शिल्पा जनक यांना गुरुवारपासून निलंबित करण्यात आलंय. शिल्पा जनक या अमरावतीमधल्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयात वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा सहाय्यक भूवैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.