विरार जेटीवर घडलेल्या थरारक घटनेत रो-रो सेवेत कार्यरत असलेल्या आदेश नाईक या तरुणाने प्रसंगावधान आणि धाडस दाखवत एका मद्यधुंद व्यक्तीचा जीव वाचवला. दुपारी सुमारास जेटीच्या टोकावर फिरत असताना त्या व्यक्तीचा तोल जाऊन तो थेट खोल पाण्यात पडला. हे पाहताच आदेश नाईक यांनी क्षणाचाही विलंब न लावता समुद्राच्या खाडीत उडी घेत बुडणाऱ्या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढले. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली असून आदेश याच्या धाडसी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.