Pune|बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई; अवैधरित्या राहणाऱ्या 5 बांगलादेशी महिला पोलिसांच्या ताब्यात

पुण्यातील बुधवार पेठ रेड लाईट एरियामध्ये फरासखाना पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधरित्या भारतात वास्तव्यास असलेल्या ५ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे मागील ११ महिन्यांत पुणे पोलिसांनी पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांची संख्या आता ९४ वर पोहोचली आहे. अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत फरासखाना पोलीस स्टेशनने बुधवार पेठ परिसरात रात्री १ ते सकाळी ९ वाजेपर्यंत कोंबींग ऑपरेशन करण्यात आले. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की माचिस बिल्डिंग परिसरात काही बांगलादेशी महिला अवैधरित्या राहत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून ५ महिलांना ताब्यात घेतले.

संबंधित व्हिडीओ