सध्या मे महिना सुरुय. ऊन मरणाचं तापलंय. पण शेतकऱ्याला स्वस्थ बसून चालणार नाही. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी उन्हातही अविरत काम करतोय. संसाराचा गाडा हाकण्यासाठी त्याला ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करताना शेतात राबावं लागतंय. जूनमध्ये चांगला पाऊस झाला की लगेच पेरणी करता यावी यासाठी बळीराजा उन्हाळ खरडा अर्थात शेती मशागतीच्या कामाला लागलाय. यात त्याचा खरा सखा म्हणजे त्याची बैलजोडी... पण यंदा बाजारात बैलांच्या किमतींमध्ये मोठी वाढ पाहायला मिळतेय. बाजारात बैलांच्या जोड्या पाहून डोळ्याचं पारणं फिटतंय. पण त्यांच्या किमती ऐकून हिरमोड होतोय... पाहूया एक रिपोर्ट