शिवसेनेत मुंबईची जबाबदारी पुन्हा श्रीकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे... १६ मे पासून पुढील २ महिने श्रीकांत शिंदे एक्शन मोडवर राहणार आहेत... मनपा निवडणुकीपुर्वी राहूल शेवाळे यांच्याकडे मुंबईची जबाबदारी सोपवण्यात आली होती...आता मुंबईची जबाबदारी पुन्हा श्रिंकात शिंदे आणि त्यापाठोपाठ राहूल शेवाळे , निलेश राणे आणि योगेश कदम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे... तिघांकडे प्रत्येकी दोन- दोन लोकसभेची जबाबदारी दिली आहे... राहूल शेवाळे – उत्तर मध्य मुंबई , दक्षिण मध्य मुंबई, निलेश राणे – ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई , योगेश कदम – मुंबई ऊत्तर, मुंबई ऊत्तर पश्चिम आणि श्रीकांत शिंदे यांच्याकडे सगळ्या लोकसभेचा चार्ज असणार आहे.