पुण्यातून हुंडाबळीची आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय.18 वर्षीय विवाहितेची हुड्यांसाठी हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. 16 वर्षांची असताना या मुलीचा विवाह तीच्या कुटुंबीयांनी लावलं होतं.त्यानंतर सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ करण्यास सुरुवात केली.तसेच पोलिसांत तक्रार केल्यास मुलाच्या घरच्यांनी मुलीचे व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिली होती.दरम्यान जेवणात विष घालून आपल्या मुलीला मारल्याचा आरोप आई-वडिलांनी केलाय.पुण्यातील कोथरूडमधून धक्कादायक प्रकार असून श्रुती सुनील बनसोडे असं मृत मुलीचं नाव आहे.4 तारखेला श्रृतीला प्रचंड उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला ,यानंतर तीला उपचारासाठी पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.5 मे तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय.