आईवरुन शिवी दिल्यानं कोल्हापुरात मित्रानेच मित्राचा खून केला.हनुमाननगरमध्ये घडलेल्या या घटनेतील आरोपीला चार तासात अटक करण्यात आली आहे. मोहन सूर्यकांत पोवार असं 70 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. चंद्रकांत केदारी शेळके असं अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. पोवार यांनी किरकोळ वादातून आई वरुन शिवी दिल्याने त्यांचा गळा चिरुन केल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. अवघ्या चार तासातच पोलिसांनी खुनाचा उलघडा केला