महापालिका निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी अवघे ४८ तास शिल्लक राहिलेले असताना आयाराम गयारामांच्या कोलांटउडीचा वेगही वाढलेला आहे.शरद पवार पक्षातील काही इच्छुकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे मोर्चा वळवला आहे.शरद पवार गटाचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ यांनी आज आपल्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह अजित पवार गटात प्रवेश केलाय.