जितेंद्र आव्हाड यांचा निष्ठावान कार्यकर्ता नितीन देशमुख यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजप आमदार गोपिचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांसोबत हाणामारी केल्याप्रकरणी नितीन देशमुख चर्चेत आले होते. नितीन देशमुखांच्या पत्नी प्रियांका देशमुख या मुंबई महापालिकेच्या पवई विभागातल्या प्रभाग क्रमांक १२४ मधून इच्छुक आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट न मिळाल्याने नाराज नितीन देशमुख यांनी तिकीट मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलाय.