Government Employees Strike|17 लाख शासकीय-निमशासकीय कर्मचारी विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून संपावर

सुधारित पेन्शन योजना, शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करणे यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील सुमारे साडे सतरा लाख शासकीय-निमशासकीय कर्मचारी येत्या मंगळवारपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी शुक्रवारी दिली. या संपात मंत्रालयीन, पालिका, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार असल्यामुळे सरकारी कार्यालये, शाळा, रुग्णालय ठप्प होणार आहेत. अत्यावश्यक सेवा या संपातून वगळल्या आहेत.

संबंधित व्हिडीओ