भारतात मधुमेहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना आपली शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी दिवसातून अनेकदा सुई टोचून रक्ताची चाचणी करावी लागते. ही पद्धत वेदनादायक असून संसर्गाची भीती निर्माण करणारी आहे. मात्र आता शरीराला सुई टोचून रक्त काढण्याची गरज उरणार नाही. नागपूरच्या संशोधकांनी एक असं उपकरण विकसित केलंय ज्याद्वारे केवळ श्वासाच्या माध्यमातून शरीरातील ग्लुकोजची पातळी मोजता येणार आहे. पाहूया कसं आहे हे नवं संशोधन आणि याचा मधुमेहाच्या रुग्णांना कसा फायदा होऊ शकतो.