अहिल्यानगर जलमय! अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आला असून, १९९६ नंतर पहिल्यांदाच नेप्ती चौकात पाणी शिरले आहे. नदीपात्रापासून ३०० ते ४०० मीटर अंतरावर पाणी आल्याने नगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.