मनमाड शहरात पुराचा कहर! मनमाड शहरात रात्रीपासून झालेल्या पावसामुळे पांझण आणि राम गुळणा नद्यांना मोठा पूर आला आहे. गुरुद्वारामागील वस्ती, गवळी वाडा या भागातील नागरिकांच्या घरात छातीएवढे पाणी शिरले. त्यामुळे त्यांचे अन्नधान्य आणि संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत. प्रशासनाच्या वतीने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले.