जळगाव जिल्ह्यातील मन्याड धरणाच्या उजव्या बाजूच्या बांधावर पाण्याचा दबाव वाढला आहे. ‘स्कोअरिंग’ वाढल्यामुळे धरणाचा बंधारा फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. बंधारा तुटल्यास नांद्रे गाव व परिसरातील गावांना पुराचा मोठा फटका बसण्याची भीती आहे. जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी रवाना झाले असून, तातडीने मजबुतीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत.