पैठण शहरात पाणी शिरण्याची भीती! जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पैठण शहरात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता, नदीकाठचे लोक स्वतःची घरे खाली करत असून, त्यांचे स्थलांतर सुरू झाले आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे.