Chandrapur Rain |चंद्रपुरातील इरई धरणाचे 7 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना | NDTV

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पातळी वाढली आहे. धरणाची सध्याची पातळी २०७.२५० मीटर इतकी झाली असून, वार्षिक सरासरीच्या 117 टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे इरई धरणाचे सात दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या इरई नदीतून 4496.5 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

संबंधित व्हिडीओ