अमरधाम स्मशानभूमीत पाणी! अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे सीना नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या बाजूलाच असलेल्या अमरधाम स्मशानभूमीत पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांवर पाण्यातच अंत्यविधी उरकण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.