जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने अनेक भागात धुमाकूळ घातलाय.मुसळधार पावसामुळे धरणातून 16 हजार 658 क्युसेकनं वाघूर नदीपात्रात विसर्ग सुरु आहे. वाघुर नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा दिलाय.. तर हतनुर धरणाचे 8 दरवाजे उघडलेत.. हतनुर धरणातून 32 हजार 666 क्युसेक पाण्याचा तापी नदी पात्रात विसर्ग सुरू असून मध्यप्रदेश विदर्भ व जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली.