कयाधू नदीत जीवघेणा प्रवास! हिंगोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर आला आहे. कळमनुरी तालुक्यातील कोंढूर गावाला अजूनही या नदीच्या पाण्याने वेढा दिला आहे. कयाधू नदी दुथडी भरून वाहत असतानाही, कोंढूर येथील शेतकरी जीव धोक्यात घालून नदी पलीकडच्या शेतात जनावरांना चारापाणी करण्यासाठी जीवघेणा प्रवास करत आहेत.