विदर्भात उष्णतेची लाट तीव्र होत असून अकोल्याने पुन्हा तापमानाचा उच्चांक गाठला आहे. काल अकोला शहरात तब्बल ४५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी १६ ते १७ मेपर्यंत यलो अलर्ट जारी केला असून तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. . याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी.