राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती राखीव प्रवर्गातच, राज्यातील आरक्षणाबाबत मंत्रिमंडळाचा निर्णय

स्पर्धा परीक्षेसाठी राखीव प्रवर्गासाठीच्या सवलती घेतल्यास खुल्या जागेवर दावा करता येणार नाहीय.कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परिक्षेस बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.. या निर्णयामुळे गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गात निवड होणाऱ्या उमेदवारांबाबत स्पष्टता निर्माण होणार असून आरक्षणाच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणि सुसंगती येणार आहे.

संबंधित व्हिडीओ