फक्त इंधनच नव्हे तर पुढील वर्षभर सोनंसुद्धा खरेदी करू नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केल्यानंतर झवेरी बाजारात याचा मोठा परिणाम पाहायला मिळतोय... एरवी लग्नसराईमध्ये झवेरी बाजारात सोनं खरेदीसाठी मोठी गर्दी असते, मात्र सध्या झवेरी बाजारात शुकशुकाट आहे...पंतप्रधानांच्या आवाहनानंतर जवळपास 90 टक्के विक्री घटलीय. त्यामुळे व्यवसायावर विपरित परिणाम झाल्याचं सोने व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे झवेरी बाजार इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी...