दिल्लीतील मालवीय नगर येथे झालेल्या भीषण हॉटेल आगीत 21 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच मुंबईत प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. कोणतीही दुर्घटना मुंबईत घडू नये यासाठी बीएमसी आणि मुंबई अग्निशमन दल पूर्णपणे सतर्क झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या जी-दक्षिण विभाग आणि वरळी अग्निशमन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत शहरातील हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस आणि डॉर्मिटरींची सखोल पाहणी केली जात आहे. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुजता द्विवेदी यांनी