भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्रात आज एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आलाय.देशातील आघाडीच्या कंपन्या मारुती सुझुकी आणि हिरो मोटोकॉर्प यांनी फ्लेक्स फ्यूल तंत्रज्ञानावर आधारित गाड्या लॉन्च करत पर्यावरणपूरक वाहनांच्या दिशेने मोठं पाऊल उचललं आहे.मारुती सुझुकीने देशातील पहिली मास-मार्केट फ्लेक्स फ्यूल कार सादर केलीय, जी पेट्रोलसोबतच इथेनॉल मिश्रित इंधनावर चालू शकते.तर हिरो मोटोकॉर्पने स्प्लेंडर आणि एचएफ डिलक्स या लोकप्रिय मॉडेल्समध्ये फ्लेक्स फ्यूल बाईक लॉन्च करत दुचाकी क्षेत्रातही या तंत्रज्ञानाची एन्ट्री केलीय.इंधनात इथेनॉलचा वापर वाढवून प्रदूषण कमी करणे आणि परकीय इंधनावरील अवलंबित्व कमी करणे, हा या तंत्रज्ञानामागचा मुख्य उद्देश आहे.