NDTV मराठीने गिरगावातील विजेची गंभीर समस्या मांडल्यानंतर BEST प्रशासनाने याची तात्काळ दखल घेतली आहे.बेस्ट प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक पथक प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी गिरगाव परिसरात पोहोचले आहेत.गेल्या काही दिवसांपासून उकाड्याच्या दिवसांत गिरगावकर या समस्येमुळे त्रस्त होते.