पुण्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोडी घडल्या.बंडखोर आणि विरोधकांनी एकामागोमाग एक अशी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली.महायुतीतील बंडखोरी शमवण्यात सुनेत्रा पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरली… कारण सुनेत्रा पवारांनी शरद पवारांशी केलेल्या चर्चेनंतर महाविकास आघाडीनंही माघार घेतली. पण या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये काकडेंच्या प्रतिज्ञापत्रातल्या संपत्तीच्या माहितीने आणि जय पवारांसोबत केलेल्या १० कोटी रुपयांच्या व्यवहारानं नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झालीय. पाहुयात एक विशेष रिपोर्ट