Vasai News| 'लग्नपत्रिका' ठरली सायबर सापळा; लग्नपत्रिका पाठवून NCPच्या महिला नेत्याचा फोन हॅक

वसई-विरारमध्ये सायबर गुन्हेगारांच्या नव्या फसवणूकचा बळी आता राजकीय क्षेत्रातील व्यक्ती देखील पडू लागल्या आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी अनिल गुरव यांचा मोबाईल हॅक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हॉट्सॲपवरील काही संदेश पाहत असताना अचानक त्यांचे खाते बंद पडले आणि काही वेळातच त्यांच्या मोबाईलवरून तब्बल ३ ते साडेतीन हजार संपर्कांना संशयास्पद 'लग्नपत्रिका' संदेश पाठवण्यात आल्याचे उघड झाले.

संबंधित व्हिडीओ