एकीकडे आगीच्या भीषण ज्वाळा आणि दुसरीकडे निष्पाप चिमुकल्यांचा आक्रोश. अशा काळजाचा ठोका चुकवणाऱ्या मृत्यूच्या तांडवात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 36 बालकांना सुरक्षित बाहेर काढणाऱ्या ३ परिचारिका आणि एका ब्रदरचा भाजपच्या वतीने सन्मान करण्यात आलाय. लहान मुलांचे प्राण वाचवणाऱ्या या देवदूतांना 50 हजारांची मदत करण्यात आली.