पुण्याच्या भोर तालुक्यातील भोंगवली येथे प्रस्तावित ७६५ केव्ही GIS सबस्टेशन आणि टॉवर लाईनच्या मुद्द्यावर उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक बोलावली आहे. खासदार सुप्रिया सुळे, स्थानिक आमदार शंकर मांडेकर आणि माजी आमदार संग्राम थोपटे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात दुपारी तीन वाजता ही बैठक होणार असून आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर चर्चा अपेक्षित आहे.
Another meeting between Devendra Fadnavis and Supriya Sule on Thursday what is the reason?