Dharashiv च्या कळंब शहराला नशेचा विळखा, अल्पवयीन मुलगा गांजा पितानाचा Video Viral

धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहराला नशेखोरीचा विळखा अधिक घट्ट होतोय. एका अल्पवयीन मुलाचा भर रस्त्यात गांजा सेवन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. धक्कादायक बाब म्हणजे या व्हिडिओमध्ये हा मुलगा पोलिसांनाही घाबरत नाही असं सांगताना दिसतोय. या व्हिडिओमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून एवढ्या लहान मुलांपर्यंत गांजा कसा पोहोचतोय, यामागील विक्री रॅकेट उघड करण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

संबंधित व्हिडीओ