Badlapur| गहाण ठेवलेलं सोनं विकलं, सोनं व्यापाऱ्याचं अपहरण; व्यापाऱ्याच्या पत्नीचेही लुटले दागिने

बदलापूरमधून धक्कादायक बातमी.ज्वेलर्सकडे गहाण ठेवलेले दागिने व्यापाऱ्यानं विकल्याच्या रागातून ज्वेलर्स व्यापाऱ्याचं अपहरण करून त्याच्या पत्नीकडून ७९ ग्रॅम सोन्याचे दागिने लुटण्यात आले. याबाबत व्यापारी पोलिसात तक्रार करणार असल्याचं समजताच त्याच्या दुकानाची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार बदलापूरमध्ये घडलाय. तोडफोडीची ही घटना सीसीटीव्हीतही कैद झालीये. बदलापूर पश्चिमेच्या वालीवली नाक्यावर भीमसिंग खरवट यांचं भैरव ज्वेलर्स हे दुकान आहे.. 15 ऑगस्ट रोजी अक्षय भोपी, युवराज भोपी आणि त्यांच्या काही साथीदारांनी भीमसिंग यांचं दुकानातून अपहरण केलं आणि एरंजाड परिसरात नेत पिस्टलचा धाक दाखवला. यानंतर त्यांना सोडण्यासाठी दुकानात असलेल्या त्यांच्या पत्नीकडून 79 ग्रॅम सोन्याचे दागिने लुटण्यात आले.याप्रकरणी खंडणी, मारहाण आणि आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. Badlapur Pledged gold sold; gold merchant kidnapped; merchant's wife also robbed of her jewelry.

संबंधित व्हिडीओ