आरएसएसचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.अमेरिकेत 'युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन'च्या टीमनं त्यांचं स्वागत केलं. ते २९ ऑगस्टला न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या 'युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन'मध्ये सहभागी होणार आहेत. भागवत यांचा हा दौरा RSS च्या शताब्दी वर्षाच्या जागतिक संपर्क कार्यक्रमांतर्गत होत आहे. RSS ला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देश-विदेशात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी RSS च्या कार्यक्रमाला पाठिंबा देत नसल्याचं सांगितलंय. फूट पाडणाऱ्या विचारधारेशी सहमत नसल्याचं त्यांनी सांगितलंय. संघाच्या कार्यक्रमाला ममदानी यांनी विरोध केल्यानंतर संघ अभ्यासक दिलीप देवधर यांनी काय प्रतिक्रिया दिली.
Reaction from RSS analyst Dilip Deodhar to NDTV after Mamdani opposed the RSS event.