नेपाळमधून धक्कादायक बातमी समोर येतेय. तिबेटमधून अचानक आलेल्या मोठ्या पुरामुळे नेपाळमध्ये हाहाकार उडालाय. तिबेटमधून वाहणाऱ्या भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरामुळे नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालंय. बाजारात उभी असलेल्या गाड्या पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेल्या. हजारो लोक या पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जातेय. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तिमुरेसह जवळच्या दोन बाजारपेठा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. नेपाळ सरकारने पाच जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला असून बचाव कार्यासाठी लष्करी हेलिकॉप्टर तैनात केली आहेत. पंतप्रधान बालेन शाह यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची तातडीची बैठक बोलावली आहे.
Nepal Floods Avalanche in Tibet causes havoc due to flooding in Nepal government issues alert for 5 districts.