Sindhudurg-Kolhapur जोडणाऱ्या मार्गाला केंद्राची मंजुरी;कोकण,पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना थेट जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुप्रतिक्षित 'घोटगे-सोनवडे घाटमार्ग' प्रकल्पाला अखेर केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. अनेक दशकांपासून रखडलेल्या या मागणीला 'ग्रीन सिग्नल' मिळाल्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.या प्रकल्पाला यापूर्वीच आवश्यक त्या पर्यावरणविषयक मंजुरी मिळाल्या होत्या. आता केंद्र सरकारची अंतिम प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाल्याने प्रत्यक्ष कामाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. कोकणातील शेतीमाल, आंबा, काजू आणि मत्स्यव्यवसाय पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठेपर्यंत वेगाने पोहोचवणे सोपे होईल. Centre approves road connecting Sindhudurg and Kolhapur; relief for citizens of Konkan and Western Maharashtra.

संबंधित व्हिडीओ