Nagpur| RTO वसुली रॅकेटवर Vijay Wadettiwar आणि Aditya Thackeray यांची प्रतिक्रिया, काय केली मागणी?

राज्यातल्या आरटीओ विभागातल्या वसुली रॅकेटचा NDTV मराठीने काही दिवसांआधीच पर्दाफाश केला होता. विधानसभेतही हा मुद्दा गाजला होता. मात्र आता याच प्रकरणी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एकीकडे संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे हे वसुली रॅकेट पुन्हा सक्रिय करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. नागपूर ग्रामीण RTO कार्यालयात रात्री चक्क एक गुप्त बैठक पार पडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आहे. वसुली रॅकेट पुन्हा कसं चालवायचं, याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचा आरोप करण्यात येतोय. या संपूर्ण प्रकाराची दखल घेत एका तक्रारदाराने थेट मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार पाठवली आहे. राज्य सरकारने एसआयटी नेमूनही जर आरटीओ कार्यालयात रात्रीच्या वेळी अशा गुप्त बैठका होत असल्याचा आरोप होतोय. तेव्हा या वसुली रॅकेटच्या सूत्रधारांना कुणाचा आशीर्वाद आहे असा संतप्त सवाल आता विचारला जातोय. नागपूर RTO मधल्या या अधिकाऱ्यांवर आणि संबंधितांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.ज्या आरटीओ अधिकाऱ्यावर आरोप झाले आहेत, त्यांनी नेमकं यावर काय स्पष्टीकरण दिलंय तेही आपण पाहूयात.. RTOचं रॅकेट पुन्हा सक्रिय होणार असेल तर असं करणाऱ्या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली.,., तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी यावर काय प्रतिक्रिया दिलीय पाहुया. Vijay Wadettiwar and Aditya Thackeray react to the RTO extortion racket; what did they demand?

संबंधित व्हिडीओ