बुलढाणा जिल्ह्यात साखरेच्या साठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार निर्बंध लागू करण्यात आले आहेत .केंद्र शासनाच्या ग्राहक व्यवहार अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या 29 जुलै रोजीच्या आदेशानुसार तसेच 28 जुलै रोजी च्या आधीसूचनेनुसार एक ऑगस्टपासून साखरेवर स्टॉक होल्डिंग लिमिट लागू करण्यात आली आहे....या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना आवश्यक कारवाही करण्याचे निर्देश दिले आहेत...साखरेचा साठा निर्धारित मर्यादित राहतो की नाही याची नियमित तपासणी करण्यासाठी संबंधित कार्यक्षेत्रात तपासणी पथके तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व साखर व्यापाऱ्यांना शासनाच्या निर्देशानुसार तातडीने संबंधित पोर्टलवर नोंदणी करण्याचे सांगण्यात आले आहे.
Restrictions imposed on sugar stocks in Buldhana; sugar traders urged to register on the portal.