अतिवृष्टीचे शासकीय अनुदान दिवाळीपूर्वी न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तहसीलदारांच्या शासकीय गाडीची तोडफोड केली. संतापलेला हा शेतकरी आज तहसील कार्यालयात फावडे घेऊन आला आणि त्याने थेट गाडीच्या काचा फोडल्या. 'जय जवान, जय किसान'च्या घोषणा देत या शेतकऱ्याने आपला संताप व्यक्त केला. या प्रकरणात पोलीस आता कायदेशीर कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.