तकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला 'महा एल्गार' मोर्चा मंगळवारी नागपुरातील जामठा परिसरात पोहोचणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाजवळील आंदोलनस्थळी, केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या शेजारी, आजपासूनच (सोमवार) २०० हून अधिक पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. या संपूर्ण तयारीचा आढावा आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी घेतला आहे.