बकरी ईदचा सण शांततेत पार पडावा यासाठी मुंबई आणि मीरारोड पोलिसांनी कंबर कसली आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काल मीरारोड आणि अंधेरी परिसरात पोलिसांनी रूट मार्च काढला. सोसायट्यांमध्ये थेट पोलिसांची परेड काढून प्रशासनाने कडक संदेश दिला आहे. मीरारोड पोलिसांनी थेट सोसायट्यांमध्ये परेड काढली. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि समाजकंटकांना इशारा देणे, हा यामागचा उद्देश आहे.दुसरीकडे, मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरातही पोलिसांनी मोठा रूट मार्च काढला. बकरी ईदच्या दिवशी कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अंधेरी पोलिसांकडून देण्यात आला आहे. सण शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा व्हावा, यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत.