Mira Road मधील बकरा Vs डुक्कर वाद मिटला, पोलीस बंदोबस्तात सोसायटीतून बकरे बाहेर काढले

मीरा रोडच्या पूनम सोसायटीत बकरा विरुद्ध डुक्कर असा वाद रंगलाय. सोसायटीत बकरी ईदच्या कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवर सोसायटीतल्या काही रहिवाशांनी आक्षेप घेतला..त्यामुळे दोन गटात वाद झाला. आज सकाळपासून या सोसायटीबाहेर हिंदुत्ववादी संघटनांनी ठिय्या आंदोलन केलं. हनुमान चालिसा पठण वगैरे केल्यानंतर दुपारच्या सुमारास काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते डुक्कर घेऊन सोसायटीच्या आवारात पोहोचले. सोसायटीच्या आवारातून बकरे बाहेर काढले जाणर नसतील, तर आपणही वराह देवाची पूजा करू अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली. त्यामुळे तणाव आणखीनच वाढला. अखेर पोलिसांनी या प्रकरणात मध्यस्थी करत वाद शमवलाय. आता सोसायटीत बकरी ईदच्या कुर्बानीसाठी आणलेल्या बकरे बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. तसंच पोलिसांनी सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पकडून बाहेर काढलं आणि डुक्करसुद्धा ताब्यात घेतलंय.

संबंधित व्हिडीओ